जगा वेगळी अंतयात्रा

जगा वेगळी अंतयात्रा

प्रदर्शित तारीख 23 March 2018
चित्रपट सारांश
आपल्या देशाला विकसित देशांच्या यादीत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याचवेळी सुशिक्षित बेकारांची समस्या देखील निर्माण झाली आहे. या समस्येवर मनोरंजनाच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न जगा वेगळी अंतयात्रा या चित्रपटातून करण्यात आला आहे. इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट अशा क्षेत्रात उच्चशिक्षण घेतलेल्या चार तरुणांची गोष्ट जगा वेगळी अंतयात्रा या चित्रपटात उलगडली आहे. सुशिक्षित बेकारीच्या यक्षप्रश्नावर हे तरुण कशा पद्धतीने मार्ग काढतात हे विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे. त्यामुळे एक आगळीवेगळी कथा, त्याची साजेशी मांडणी आणि निखळ मनोरंजन असे सारे काही या चित्रपटात आहे. केवळ मनोरंजनच नाही तर माणुसकी संपत चाललेल्या आजच्या जगात प्रत्येकाला स्वतःचे आत्मचिंतन करायलाही हा चित्रपट भाग पाडतो. केवळ आपल्यापुरता विचार करणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचाही प्रयत्न या निमित्त करण्यात आला आहे. गंभीर विषयाला विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे, हसता हसता एका महत्वाच्या समस्येबाबतही हा सिनेमा विचार करायला प्रवृत्त करणारा असल्याचे दिग्दर्शक अमोल लहांडे यांनी सांगितले.
चित्रपट दृश्य 960
लोकांना आवडले 0

जगा वेगळी अंतयात्रा या चित्रपटातील गाणी